महाराष्ट्राला चुना लावला, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी विजय वडेट्टीवार यांची टीका

महाराष्ट्राला चुना लावला, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी विजय वडेट्टीवार यांची टीका

महायुती सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात 701 कोटी रुपये मिळाली अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार केली आहे. तसेच प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र घोषणा मोठ्या, काम कमी हेच तंत्र असेही वडेट्टीवार म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून वडेट्टीवार म्हणाले की, “प्रसिद्धीसाठी महायुतीचा एकच मंत्र घोषणा मोठ्या, काम कमी हेच तंत्र ” मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या अमृत महोत्सव निमित्त गेल्यावर्षी महायुती सरकारने वाजत गाजत कॅबिनेट बैठक घेतली. जोरदार पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी ४५ हजार कोटींची घोषणा केली होती.पण
घोषणा होऊन एक वर्ष झाले पण मराठवाड्याला मिळाले किती तर फक्त ७०१ कोटी. मराठवाडा भागात पाण्यासाठी स्वतंत्र १४ हजार ४० कोटींची घोषणा केली होती मिळाले फक्त ६१ कोटी असे वडेट्टीवार म्हणाले.

आता मराठवाडयातील जनतेने हिशोब करुन अंदाज घ्यावा की या महायुती सरकारने त्यांना किती कोटीने फसविले? असा सवाल करत महाराष्ट्राला देखील किती चुना लावत आहेत असेही वडेट्टीवार म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;