मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक, पोलिसांनी घेतले ताब्यात

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक, पोलिसांनी घेतले ताब्यात

मंत्री चंद्रकात पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला एका मद्यधुंद चालकाने धडक दिली आहे. या अपघातात एका सुरक्षा रक्षकाला मुकामार लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

चंद्रकांत पाटील रात्री गणेश मंडळांना भेटी देऊन घरी परतत होते. तेव्हा रात्री साडे बाराच्या सुमारास कोथरुडमधील आशिष गार्डनर चौकातून त्यांचा ताफा महात्मा सोसायटीच्या दिशेने गेला. तेव्हा एका भरधाव गाडीने पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की धडक देणाऱ्या गाडीचे बोनेट उडाले आणि एअरबॅग्सही उघडल्या गेल्या.

आपल्या ताफ्यातील गाडीला धडक बसल्यानंतर पाटील यांना संपूर्ण ताफा थांबवला. गाडीतून उतरून अपघातग्रस्त गाडीची पाहणी केली. या अपघातात त्यांच्या एका सुरक्षारक्षकाला मुकामार लागला.

पोलिसांना या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी दारू पिऊन गाडी चालवत होता. जेव्हा आरोपी गाडी चालवत होता तेव्हा त्याच्यासोबत तीन मित्र आणि दोन मैत्रिणीही गाडीत उपस्थित होत्या. पोलिसांना याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;