लखनऊच्या आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ; शरीरावर आढळल्या अनेक जखमा

लखनऊच्या आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ; शरीरावर आढळल्या अनेक जखमा

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील आमदार निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांना आमदार निवासातच्या पायऱ्यांवर एक तरूण आढळून आला त्याच्या अंगावर अनेक जखमा आढळून आल्या.त्यामुळे पोलिसांनी जखमी अवस्थेत तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लखनऊच्या हुसैनगंज भागात एक बहुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीतच आमदारांना घरे दिली जातात. याच आमदार निवासाजवळील पायऱ्यांवर सुमारे 25 ते 30 वर्षांच्या तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. यावेळी पोलिसांनी त्या तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला  मृत्यू घोषित केले. अद्याप तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

हुसैनगंज पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना तरुणाकडून कोणताही कागद किंवा मोबाईल अथवा अन्य कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे या प्रकरणाची सध्या सखोल चौकशी केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;