Pune News – बाप अन् मुलाच्या भांडणात मध्यस्थी केली, दारूच्या नशेत पतीने पत्नीचं बोट कापलं
पुण्यात पतीने दारुच्या नशेत पत्नीचे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुटुंबीयांनी महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. पत्नीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पासवान असे आरोपी पतीचे नाव आहे. तर पीडित पत्नीचे नाव संजू पासवान असे आहे. शनिवारी पतीचे मुलासोबत काही कारणांमुळे भांडण झाले. यामुळे पत्नी संजू यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पत्नीने मध्यस्थी केल्यामुळे सुरज पासवान याचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नीचे उजव्या हाताचे बोट कापून टाकले. त्यानंतर पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दिली. तक्रारिनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी सूरज पासवानला अटक केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List