अक्षय कुमारच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी सोडलं घर, पत्नी म्हणाली, ‘माझं घर सोडून गेलास तेव्हा…’

अक्षय कुमारच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी सोडलं घर, पत्नी म्हणाली, ‘माझं घर सोडून गेलास तेव्हा…’

अभिनेता अक्षय कुमार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण खिलाडी कुमारच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्याच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी घरी सोडलं आणि स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगू लागला… याबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती आहे. आता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने लेकाने घर सोडल्यानंतर मनातील भावना व्यक्त केल्या. मुलाच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर खास पोस्ट करत ट्विंकल खन्ना हिने मनातील भावना व्यक्त केल्या.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या मुलाचं नाव आरव असं आहे. वयाच्या 15 व्या वर्षी आरव याने आई – वडिलांचं घर सोडलं आहे. सध्या आरव लंडन याठिकाणी असून फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

लेक आरव बद्दल ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘जेव्हा तू मला सतत म्हणायता तुला जायचं आहे आणि तुला तुझं आयुष्य जगाचं आहे. तेव्हा मला कायम वाटायचं माझं घर सोडून तू जेव्हा स्वतःच्या घरात पाय ठेवशील तेव्हा माझं आयुष्यात अंधकार येईल. त्यानंतर जेव्हा केव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा दिवे लावून सर्वांना सांगेल, ही टेम्परेरी पॉव्हर कट नाही तर, आम्ही दिवाळी साजरी करत आहोत.’

पुढे ट्विंकल म्हणाली, ‘पण नंतर मला कळंल जो मनात असतो, तो कधीच लांब जात नाही. मग त्या व्यक्तीने देश बदलला तरी काहीही हरकत नाही. माझं जग तुझ्या एका फोन कॉल आणि मेसेजने प्रकाशित होतं. मग ते घाणेरड्या कपड्यांबद्दल असूदे…’ सध्या सर्वत्र ट्विंकलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

ट्विंकल खन्ना हिच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता बॉबी देओल, नम्रता शिरोडकर, हुमा कुरैशी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विंकल खन्ना हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मुलाबद्दल काय म्हणाला होता अक्षय कुमार?

अभिनेता म्हणाला, ‘माझा मुलगा आरव लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. त्याला वाचायला प्रचंड आवडतं. त्याला एकटं राहायला आवडतं. ट्विंकल आणि मी ज्याप्रमाणे आरव याचं पालन-पोषण केलं आहे. त्यावर आम्हाला आनंद आहे. आरव प्रचंड साधा मुलगा आहे. पण माझ्या मुलीला कपडे प्रचंड आवडतात.’ आरवचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;