सलमान खानच्या नावावर मोठा घोटाळा सुरु, टीमकडून चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न, काय आहे संपूर्ण प्रकरण?

सलमान खानच्या नावावर मोठा घोटाळा सुरु, टीमकडून चाहत्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न, काय आहे संपूर्ण प्रकरण?

अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असता. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याच्या यूएस टूरची चर्चा रंगली आहे. यंदाच्या वर्षी सलमान खान यूएसमध्ये कॉन्सर्ट घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण नुकताच, सलमान खानने त्याच्या टीमच्या माध्यमातून या रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असून फसवणूक होत असल्याचं म्हटले आहे. सलमान खानने त्याच्या चाहत्यांना सांगितले की, टूरबद्दल रंगणाऱ्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत.

अमेरिकेत कार्यक्रम करण्याचा किंवा प्रवास करण्याचा कोणताही विचार नाही. त्यामुळे अशा कोणत्याही फसव्या कॉल किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका…. असं अभिनेता सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाला आहे. काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल होत होती ज्यामध्ये सलमान खान 5 ऑक्टोबरला अमेरिकेतील आर्लिंग्टन थिएटरमध्ये परफॉर्म करणार असल्याचे लिहिलं होतं.

अशात चाहत्यांची फसवणूक होऊ नये म्हणून सलमान खान याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अमेरिका दौऱ्यासंदर्भात अधिकृत नोटीस जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये सलमान खान याच्या नावावर मोठा घोटोळा सुरु असल्याचा उल्लेख केला आहे. शिवाय अभिनेत्याच्या टीमकडून चाहत्यांना सतर्क देखील करण्यात आलं आहे.

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये…

पोस्टमध्ये करण्यात आलाय मोठा खुलासा, ‘सलमान खान किंवा अफिलेट कंपनी किंवा टीमकडून यूएसमध्ये यंदाच्या वर्षी कोणत्याच कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं नाही.’ शोमध्ये सलमान खान परफॉर्म करेल असं देखील सांगण्यात येत आहे. त्याबद्दल अभिनेत्याची टीम म्हणाली, ‘सर्व फक्त अफवा आहेत. कृपया अशा कोणत्याच गोष्टींवर विश्वास ठेऊ नका. जर कोणी अभिनेत्याच्या नावाचा गैरवापर करताना आढळून आलं, तर त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई केली जाईल.’ असं देखील पोस्टमध्ये म्हणण्यात आलं आहे.

सलमान खानच्या मॅनेजरकडून चेतावनी

सलमान खान याची मॅनेजर जॉर्डी पटेल याने नुकताच एका पोस्ट करत चेतावनी दिली आहे. ‘सलमान खानच्या नावावर तिकिटे खरेदी करू नका. कारण सलमान खान यूएममध्ये जाणार नाही…’ असं देखील पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगली आहे.

सलमान खान याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘सिकंदर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;