मित्राला पैशांची गरज होती.. ‘ती’ ने आईच्या हत्येची सुपारीच दिली

मित्राला पैशांची गरज होती.. ‘ती’ ने आईच्या हत्येची सुपारीच दिली

मित्राला पैशांची गरज असल्याने मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईच्या हत्येची दहा लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. प्रिया नाईक असे हत्या झालेल्या दुर्दैवी आईचे नाव आहे. आई मोबाईलवर दुर्दैवी प्रिया नाईक सतत लक्ष ठेवून असते तसेच बाहेर येण्या-जाण्याला रोखते याचाच राग मनात ठेवून मुलगी प्रणाली हिने आपल्या मित्रांच्या मदतीने आईला संपवले. याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी मुलगी प्रणालीसह तिचे मित्र विवेक पाटील व विशाल पांडे यांना बेड्या ठोकल्या आहेत.

प्रिया नाईक यांची मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. मात्र पतीसोबत भांडण झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून ती माहेरी आपल्या आईवडिलांकडे राहण्यास आली होती. पतीला सोडल्यानंतर प्रणालीच्या आईने तिच्या बाहेर येण्या-जाण्यावर तसेच सतत फोनवर बोलण्यास बंधने घातली. प्रणाली घराबाहेर गेल्यानंतर तिला सतत फोन करून विचारणा करणे, मोबाईल फोन तपासणे या सगळ्या गोष्टींना ती वैतागली होती. दरम्यान प्रणालीचा मित्र व मानलेला भाऊ विवेक पाटील याने तिला पैशांची गरज असल्याचे सांगत मदत करण्यास सांगितले. त्यावेळी आईच्या निर्बंधातून सुटकेसाठी प्रणालीने आईला संपवण्याचा कट रचला आणि विवेकला 10लाख रुपये देण्याचे आश्वासन देऊन थेट आईच्या हत्येची सुपारी दिली.

वायरने गळा आवळला
प्रणालीचे वडील प्रल्हाद नाईक हे कामावर गेल्यानंतर विवेक व त्याचा मित्र विशाल पांडे हे प्रणालीच्या घरी गेले व प्रिया या एकट्या असल्याची संधी साधत वायरने त्यांचा गळा आवळून हत्या केली. सुरुवातीला पनवेल पोलिसांनी प्रिया यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास केला व प्रणाली नाईक, विवेक पाटील व विशाल पांडे या तिघांना अटक केली. पनवेल न्यायालयाने त्या तिघांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;