वांद्रे वरळी सी लिंकवर रेस लावण्याच्या नादात अपघात, एकाच कुटुंबातला पाच जण थोडक्यात बचावले

वांद्रे वरळी सी लिंकवर रेस लावण्याच्या नादात अपघात, एकाच कुटुंबातला पाच जण थोडक्यात बचावले

BMW चालक आणि मर्सिडीज चालक वांद्रे वरळी सी लिंकवर शर्यत लावत होते. आणि या शर्यतीच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातात एक पाच जणांचे कुटंब थोडक्यात वाचले. या प्रकरणी दोन चालकांविरोधात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे वरळी सी लिंकवर तारीक चौधरी आणि शाहबाज खान हे आपली बीएमडबल्यू आणि मर्सिडीज घेऊन निघाले. वांद्रे वरळी सी लिंकवर या दोघांनी शर्यत लावली. सी लिंकवर दोघेही ताशी १२० किमी वेगाने गाडी चालवत होते. तेव्हा या दोघांच्या मध्ये एका कुटुंबाची वॅगन आर गाडी आली आणि या गाडीला दोन्ही गाड्यांची धडक लागली. या अपघातात तिन्ही गाडीतले प्रवासी जखमी झाले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून. चालकांवर उपचार केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;