Video राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख देऊ, मिंधे गटाच्या संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

Video राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख देऊ, मिंधे गटाच्या संजय गायकवाड यांचे वादग्रस्त वक्तव्य

वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असलेले मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. -जो कुणी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला मी 11 लाख रुपये देईन, असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता वादाला तोंड फोडलं आहे. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आरक्षणाच्या संदर्भात राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया देताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. ”’राहुल गांधी यांचं वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचं पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असं खोटं नरेटिव्ह पसरवतात. पण प्रत्यक्षात देशाला 400 वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी 11 लाख रुपये बक्षीस देईन, असं संजय गायकवाड म्हणाले.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;