भाजप नेत्याने पोलिसाला युनिफॉर्म उतरवण्याची दिली धमकी, पोलीस अधिकाऱ्याने फाडला युनिफॉर्म

भाजप नेत्याने पोलिसाला युनिफॉर्म उतरवण्याची दिली धमकी, पोलीस अधिकाऱ्याने फाडला युनिफॉर्म

भाजप नेत्याने एका पोलीस अधिकाऱ्याला गणवेश उतरवण्याची धमकी दिली. तेव्हा चिडलेल्या या अधिकाऱ्याने कार्यालयातच आपला गणवेश फाडला. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली असून नाल्याचा कामावरून हा वाद झाला आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की मध्य प्रदेशच्या सिंगरौली भागात वॉर्ड क्रमांक 44 मध्ये पोलीस अधिकारी विनोद मिश्रा राहतात. त्यांच्या घराच्या समोर एक नाला आहे. या नाल्याचे सतत काम निघत राहतं. त्यामुळे मिश्रा यांना घराबाहेर पडताना नेहमी त्रास होतो. त्यामुळे मिश्रा यांनी हा नालाच बंद केला. तेव्हा या विभागाच्या नगरसेविकाचे पती अर्जून दास तिथे आले. दास आणि मिश्रा यांच्यात नाल्यावरून वाद झाला. हा वाद महानगरपालिकेच्या कार्यालयात पोहोचला. तेव्हा भाजप नेते अर्जून दास गुप्ता यांनी मिश्रा यांचा गणवेश उतरवण्याची भाषा केली. तेव्हा चिडलेल्या मिश्रा यांनी आपला गणवेश फाडला आणि फेकून दिला.

या वॉर्डाच्या नगरसेविका या गौरी गुप्ता आहेत पण त्यांचे पती अर्जून दास गुप्ता कामात नेहमी दखल देतात अशी तक्रार होत आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे. काँग्रेसने हा व्हिडीओ शेअर करून भाजप सरकारवर टीका केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;