वनराजनंतर आता ‘अनुपमा’मधील आणखी एका तगड्या कलाकाराची एक्झिट

वनराजनंतर आता ‘अनुपमा’मधील आणखी एका तगड्या कलाकाराची एक्झिट

‘अनुपमा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच या मालिकेच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला होता. कारण त्यात वनराजची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता आणखी एक कलाकार या मालिकेतून बाहेर पडणार असल्याचंही कळतंय. काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मा मालिकेचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा मदालसा त्यात नकारात्मक भूमिकेत झळकली होती. मात्र हळूहळू तिच्या भूमिकेचं स्वरुप बदलत गेलं.

मदालसा ही ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मालिकेत ती वनराज शाहच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत आहे. काव्या या भूमिकेचं मालिकेत बरंच महत्त्व होतं. परंतु जसजसं कथानक बदलत गेलं, तसतसं तिच्या भूमिकेचंही महत्त्व बदलत गेलं. सुरुवातीला अनुपमाच्या विरोधात असणारी काव्या आता मालिकेत तिची खास मैत्रीण बनली आहे. मालिका सोडण्यामागचं कारण मदालसाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मदालसा म्हणाली, “जेव्हा मी या मालिकेत काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा काव्याची भूमिका ही सक्षम आणि स्वतंत्र महिलेची होती. एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडण्याचं धाडस तिच्यामध्ये होतं. तिच्या भूमिकेला नकारात्मक छटा होती. कथानकानुसार त्यात बरेच बदल होत गेले. आता मालिकेची कथासुद्धा वनराज, अनुपमा आणि काव्या यांच्यासंबंधीची राहिली नाही. ही भूमिका साकारण्यात आता पहिल्यासारखी मजा येत नाही. जर काव्याच्या भूमिकेला आधीसारखंच महत्त्व असतं, तर मी या मालिकेत थांबली असती.” मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने काव्याच्या भूमिकेत काही बदल करण्याचा प्रयोग केला, मात्र तो यशस्वी ठरला नसल्याची भावना मदालसाने बोलून दाखवली.

‘अनुपमा’ या मालिकेला आतापर्यंत तोषूची भूमिका साकारणारा आशिष मल्होत्रा, समर शाहच्या भूमिकेतील अभिनेता पारस कलनावत, पाखीच्या भूमिकेतील अभिनेत्री मुस्कान बामणे या कलाकारांनी रामराम केला आहे. या मालिकेत रुपाली गांगुली, गौरव खन्ना, निधी शाह मुख्य भूमिकेत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;