आईला गरोदरपण लपवावं लागलं..; नीना गुप्ता यांच्याविषयी काय म्हणाली मसाबा?

आईला गरोदरपण लपवावं लागलं..; नीना गुप्ता यांच्याविषयी काय म्हणाली मसाबा?

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. बाळाच्या जन्माआधी मसाबाने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत ती तिच्या आईच्या संघर्षाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पत्रकार फाये डिसूझाच्या पॉडकास्टमध्ये मसाबाने आई नीना गुप्ता यांच्या गरोदरपणातील संघर्ष सांगितला. त्यावेळी नीना यांना आर्थिक समस्यांचाही सामना करावा लागला होता. तर लग्नाशिवाय जन्म झाल्याने मसाबाला तिच्या शाळेत इतर विद्यार्थ्यांकडून टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. मसाबा ही नीना आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. विवियन आणि नीना यांनी कधीच लग्न केलं नाही. विवाहित असतानाही ते नीना गुप्ता यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. यात नात्यातून त्यांना मुलगी झाली.

“जेव्हा माझी आई गरोदर होती तेव्हा तिची आईसुद्धा तिच्यासोबत नव्हती. माझे आजोबा, आईचे वडील तिच्याविरोधात होते. कारण लग्नाशिवाय ती गरोदर होती. माझे वडील विवियन रिचर्ड्ससुद्धा त्यावेळी तिच्यासोबत नव्हते. आईच्या काही मैत्रिणी होत्या, पण तेव्हाचा काळ वेगळा होता. प्रत्येकाला आपापलं आयुष्य होतं. ती गरोदर असल्याचं लोकांना सांगू शकत नव्हती. सुरुवातीला तिला ते गरोदरपण लपवावं लागलं होतं. तिच्याकडे पैसेही नव्हते. या सगळ्या परिस्थितीचा सामना कसा केला असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारते, तेव्हा ती मला फक्त इतकंच म्हणते की, मला बाळ होणार या गोष्टीने मी खूप खुश होते. बाळाला लहानाचं मोठं कसं करेन हे मलाच माहीत नव्हतं”, असं मसाबाने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Masaba 🤎 (@masabagupta)

मसाबाला तिच्या शाळेतही टीकेला सामोरं जावं लागलं होतं. “माझ्या आईवडिलांचं लग्न झालं नव्हतं. त्यामुळे ही गोष्ट माझ्याविरोधात 100 टक्के वापरली गेली. लहान मुलंसुद्धा मोठ्यांसारखे टोमणे मारायचे. कदाचित त्यांनी त्यांच्या घरात अशा गोष्टी ऐकल्या असतील. हे सर्व मी सातवीत असताना घडलं होतं. माझ्या दिसण्यावरूनही टीका व्हायची. त्यामुळे शाळेत असताना माझे फारसे मित्र नसायचे”, असं मसाबा म्हणाली.

मसाबा गुप्ता लवकरच आई होणार आहे. मसाबाने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात अभिनेता सत्यदीप मिश्राशी दुसरं लग्न केलं. याआधी तिने निर्माता मधू मंटेनाशी पहिलं लग्न केलं होतं. 27 जानेवारी रोजी पार पडलेल्या या लग्नाला फक्त कुटुंबीयच उपस्थित होते. यावेळी मसाबाचे वडील विवियन रिचर्ड्स, सावत्र वडील विवेक मेहरा, आई नीना गुप्ता, सत्यदीपची आई आणि बहीण एकाच फ्रेममध्ये दिसले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;