अभिषेक बच्चन नव्हे तर आराध्या बनली आई ऐश्वर्या रायची सपोर्ट सिस्टीम, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, घटस्फोटाच्या…

अभिषेक बच्चन नव्हे तर आराध्या बनली आई ऐश्वर्या रायची सपोर्ट सिस्टीम, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, घटस्फोटाच्या…

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावरही ऐश्वर्या राय सक्रिय असते. ऐश्वर्या राय ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचे सातत्याने सांगितले जातंय. हेच नाही तर जलसा बंगला सोडून आपल्या आईच्या घरी ऐश्वर्या राय शिफ्ट झाल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. मात्र, सततच्या घटस्फोटाच्या चर्चांवर ऐश्वर्या राय किंवा अभिषेक बच्चन यांनी काहीच भाष्य केले नाहीये.

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही विदेशात आपल्या मुलीसोबत गेली. ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबत स्पॉट होताना दिसते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या हिच्यासोबतच पोहोचली होती. यावेळीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले.

नुकताच दुबईमध्ये SIIMA 2024 चे खास आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऐश्वर्या राय हिला ‘पोनियिन सेल्वन: II’ मधील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी SIIMA 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक पुरस्कार मिळाला. या चित्रपटात अभिनेत्री नंदिनीच्या भूमिकेत होती. याच भूमिकेसाठी आता ऐश्वर्याला पुरस्कार मिळाला आहे. 

पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने एक स्पीच देखील दिले. ऐश्वर्या राय हिची लेक पुरस्कार मिळाल्यापासून ते आईच्या स्पीचपर्यंत सर्वकाही तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करताना दिसली. हेच नाही तर आराध्या बच्चन हिच्या चेहऱ्यावर यावेळी एक वेगळाच आनंद देखील बघायला मिळाला. आई ऐश्वर्याला सपोर्ट करताना आराध्या दिसली.

आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये आराध्या ही आईचा व्हिडीओ काढताना दिसत आहे. ऐश्वर्या हिने पुरस्कार मिळाल्यानंतर केलेले भाषण सर्वांनाच आवडताना दिसत आहे. ऐश्वर्या राय हिला तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ऐश्वर्या राय हिचा चाहतावर्गही अत्यंत मोठा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;