डिस्चार्ज मिळताच बाळासोबत दीपिका पादुकोणचा पहिला फोटो समोर

डिस्चार्ज मिळताच बाळासोबत दीपिका पादुकोणचा पहिला फोटो समोर

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहच्या घरात गणेशोत्सव काळात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. 8 सप्टेंबर रोजी दीपिकाने मुलीला जन्म दिला. नुकतंच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर रणवीर आणि दीपिकाचा बाळासोबत पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. या फोटोमध्ये दीपिकाच्या हातात बाळ असून छोट्या परीकडे रणवीर अत्यंत प्रेमाने पाहताना दिसून येत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. या फोटोमध्ये नुकतेच आई-बाबा बनलेल्या दीपिका-रणवीरच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट पहायला मिळतोय.

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दीपिका घरी परतत असताना पापाराझींनी तिचा हा फोटो काढला आहे. यात कारच्या मागच्या सीटवर रणवीर आणि दीपिका बसलेले दिसत असून दीपिकाच्या हातात बाळ आहे. दीपिका बाळाकडे पाहून हसताना दिसतेय तर रणवीरसुद्धा अत्यंत प्रेमाने बाळाकडे पाहतोय. या फोटोमध्ये दीपिकाचे सासरे आणि रणवीरचे वडीलसुद्धा हसताना दिसत आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायो बदलला आहे. तिच्या बायोमधील या नव्या मजकूराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. आई बनल्यानंतर दीपिकाचं आयुष्य कसं सुरू आहे, हे मजकूर वाचल्यानंतर लक्षात येतं. ‘फीड, बर्प, स्लीप, रीपिट’ असं तिने लिहिलंय. बाळाच्या रुटीनचं वर्णन करणारा हा बायो आहे.

दीपिकाला मुलगी होताच रणवीरची मोठी इच्छा पूर्ण झाली असं म्हटलं जातंय. रणवीरने त्याच्या एका जुन्या मुलाखतीत ही खास इच्छा बोलून दाखवली होती. त्याला मुलगी हवी होती आणि अखेर त्याची ही इच्छा पूर्ण झाली आहे. मुलीच्या जन्मानंतर रणवीर आणि दीपिकाने इन्स्टाग्रामवर ‘बेबी गर्लचं स्वागत’ अशी पोस्ट लिहित त्याखाली जन्मतारखेचा उल्लेख केला होता. या पोस्टवर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

बाळाच्या जन्मानंतर दीपिका मार्च 2025 पर्यंत कामातून ब्रेक घेणार असल्याचं कळतंय. त्यानंतर ती ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्याचप्रमाणे दीपिका आणि रणवीर नव्या घरात राहायला जाणार असल्याचंही कळतंय. दीपिका-रणवीर हे त्यांच्या नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत. हे घर अभिनेता शाहरुख खानच्या ‘मन्नत’ या बंगल्याच्या शेजारीच आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;