आजीला पाहताच वाजवल्या टाळ्या, बोबड्या भाषेत लागली बोलू; राहाच्या व्हिडीओवर नेटकरी फिदा

आजीला पाहताच वाजवल्या टाळ्या, बोबड्या भाषेत लागली बोलू; राहाच्या व्हिडीओवर नेटकरी फिदा

अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नुकतंच या दोघांना मुंबई विमानतळावर पाहिलं गेलं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी राहासुद्धा होती. राहासोबत आलिया आणि रणबीर फिरायला जात होते. एअरपोर्टवर पापाराझींनी राहाचे काही फोटो आणि व्हिडीओ क्लिक केले असून सध्या नेटकऱ्यांमध्ये तिचीच चर्चा होत आहे. राहाने पहिल्यांदाच पापाराझींना पाहून हात दाखवला होता. आलिया आणि रणबीर एअरपोर्टच्या गेटवर असतानाच नीतू कपूरसुद्धा तिथे पोहोचल्या होत्या. आजीला पाहताच राहा आनंदाने टाळ्या वाजवू लागली होती. त्यानंतर बोबड्या भाषेत ती त्यांच्याशी बोलू लागली होती. पापाराझींनी हे क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. राहाचा हा क्यूट व्हिडीओ नेटकऱ्यांनाही खूप आवडला आहे.

आलिया आणि रणबीरने 14 एप्रिल 2022 रोजी लग्न केलं होतं. लग्नाआधी दोघं जवळपास पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. लग्नाच्या आठ महिन्यांनी आलियाने मुलीला जन्म दिला. सुरुवातीला रणबीर आणि आलिया हे राहाचा चेहरा कॅमेरासमोर दाखवत नव्हते. मात्र गेल्या वर्षी त्यांनी स्वत:हून राहाला पापाराझींसमोर आणलं. दरवर्षी ख्रिसमसनिमित्त कपूर कुटुंबीय एकत्र येतात. त्यावेळी लंचच्या आधी रणबीर आणि आलिया राहाला घेऊन पापाराझींसमोर आले होते. राहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तिच्या व्हिडीओला अवघ्या सहा मिनिटांत 10 लाख व्ह्यूज मिळाले होते, अशी माहिती पापाराझो मानव मंगलानीने एका मुलाखतीत दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुलीचा चेहरा सर्वांसमोर न आणण्याविषयी आलिया एका मुलाखतीत म्हणाली होती, “माझ्या मुलीबद्दल कोणतीच गोष्ट बोलण्यासाठी मी सध्या कम्फर्टेबल नाही. अनेकांकडून मला शुभेच्छा आणि आशीर्वाद मिळत आहेत. मला राहाची आई अशी हाक मारली जात आहे, जे मला खूपच क्युट वाटतं. पण ज्यांच्यावर मी प्रेम करते, त्यांच्याबाबत मी फार प्रोटेक्टिव्ह आहे. मला खरंच असं वाटतं की बाळाने पब्लिक पर्सनॅलिटी व्हायची काही गरज नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे.”

दुसरीकडे रणबीर मुलीविषयी बोलताना एका मुलाखतात म्हणाला, “पालक म्हणून आम्ही राहाच्या प्रायव्हसीला शक्य तितकं जपण्याचा प्रयत्न करतोय. एका सामान्य मुलीप्रमाणे ती लहानाची मोठी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. सामान्य मुलींप्रमाणेच तिने शाळेत जावं. इतर मुलामुलींमध्ये तिने स्वत:ला वेगळं समजू नये, असं आमचं मत आहे.”

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;