शेअर बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्सची दमदार एन्ट्री, लिस्टिंगलाचा गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा

शेअर बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्सची दमदार एन्ट्री, लिस्टिंगलाचा गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा

सध्या शेअर बाजारात आयपीओमधून जबरदस्त कमाई होत आहे. या वर्षात अनेक आयपीओने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. आता सोमवारी शेअर बाजारात बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ लिस्ट झाला आहे. या आयपीओला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या आयपीओच्या लिस्टिंगकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणेच या आपीओने शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री घेतली असून लिस्टिंगलाचा या आय़पीओने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करत तब्बल दुप्पच परतावा दिला आहे.

प्रतीक्षा असलेल्या अनेक आयपीओपैकी महत्त्वाचा असलेला बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ सोमवारी लिस्ट झाला आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या या आयपीओसाठी प्रति शेअर 66 ते 70 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. सोमवारी हा शेअर बाजारात 114 टक्के म्हणजेच 150 रुपयांच्या किमतीवर लिस्ट झाला. म्हणजेच ज्यांना आयपीओचे अलॉटमेंट मिळाले होते, त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

अनेक वर्षांनंतर बजाज समूहाची एक कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाली. लिस्टिंगच्या दिवशी कंपनी दमदार सुरुवात करू शकते आणि गुंतवणूकदारही मोठा नफा कमावू शकतात, अशी अपेक्षा यापूर्वी अनेकांना होती. त्यामुळे या आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमानुसार आघाडीच्या नॉन बँकिंग फायान्शिअल कंपन्यांना सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट होणं आवश्यक आहे. त्यासाठी बजाजने हा आयपीओ बाजारात आणला होता. आता त्यांची दमदार सुरुवात झाली असून आगामी काळात या शेअरचे भाव वधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;