गोविंदाच्या मुलीने तीन महिन्यांतच गमावले होते प्राण; पत्नीने सांगितलं दु:ख

गोविंदाच्या मुलीने तीन महिन्यांतच गमावले होते प्राण; पत्नीने सांगितलं दु:ख

अभिनेता गोविंदाने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. करिअरच्या शिखरावर असतानाच त्याने सुनिता अहुजाशी लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनिताने त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला आहे. गोविंदा आणि सुनिता यांना यशवर्धन हा मुलगा आणि टीना ही मुलगी आहे. मुलांसोबत कसं नातं आहे, याविषयी सुनिताने सांगितलं. सुनिता आणि गोविंदा यांना आणखी मुलगी होती. मात्र अवघ्या तीन महिन्यांतच तिने प्राण गमावले होते. याविषयी सुनिता या मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

‘टाइम आऊट विथ अंकित’ या पॉडकास्टमध्ये सुनिताने सांगितलं की तिने मुलाचे खूप लाड केले आणि त्यामागे खूप मोठं कारण होतं. “यशचे खूप लाड झाले कारण तो टीनापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. यशच्या आधी मी एका मुलीला जन्म दिला होता. पण डिलिव्हरीच्या वेळेच्या आधीच तिचा जन्म झाल्याने ती फार काळ जगू शकली नाही. अवघ्या तीन महिन्यांत ती आम्हाला कायमची सोडून गेली. तिची फुफ्फुसं विकसित झाली नव्हती. म्हणूनच मी यशला खूप लाडात वाढवलंय, कारण मी खूप घाबरले होते. आता मला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या लागतात, पण तेसुद्धा ठीक आहे”, असं सुनिता म्हणाली.

“मी माझ्या दोन्ही मुलांची खूप काळजी घेतली आहे. त्यांना शाळेतसुद्धा मीच घेऊन जायची आणि आणायची. मी कधीच माझ्या मुलांना नॅनीसोबत सोडलं नव्हतं”, असंही सुनिताने स्पष्ट केलं. गोविंदा जेव्हा बी. कॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होता, तेव्हा त्याची सुनिताशी भेट झाली होती. “त्यावेळी आमचं अफेअर नव्हतं. कारण मला तो ठीकठाक वाटला होता. तो विरारचा राहणारा होता आणि मी पाली हिल इथली होती. आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात पडू आणि लग्न करू असा विचारसुद्धा त्यावेळी डोकावला नव्हता”, असं सुनिताने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yashvardhan (@ahuja_yashvardhan)

सुनिता अहुजाने गोविंदाशी 1987 मध्ये लग्न केलं. त्यावेळी गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीत नुकतंच पदार्पण केलं होतं. करिअरवर परिणाम होईल या भीतीने दोघांनी जवळपास वर्षभर लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. अखेर जेव्हा त्यांची मुलगी एक वर्षाची झाली, तेव्हा गोविंदाने त्याच्या लग्नाचा खुलासा केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;