रायगडकरांची बोट अ‍ॅम्ब्युलन्स लालफितीत; प्रस्ताव सहा वर्षापासून धूळखात

रायगडकरांची बोट अ‍ॅम्ब्युलन्स लालफितीत; प्रस्ताव सहा वर्षापासून धूळखात

अपघात किंवा अन्य अत्यवस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईत उपचार मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात बोट अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार होती. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे पाठवला आहे. मात्र सहा वर्षे उलटली तरी सरकारने यावर निर्णय घेतला नसून ही रुग्णवाहिका लालफितीत अडकली आहे.

रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे असून या ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येत असतात. अनेकदा रुग्ण अत्यवस्थ झाले तर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते. अलिबाग-मुंबई हे अंतर 120 किलोमीटर असल्याने अनेकदा वेळेत उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे रुग्णावर जलदगतीने उपचार होण्यासाठी बोट रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा आरोग्य विभागाने मंत्रालयात पाठवला आहे, परंतु यावर अद्याप निर्णय न झाल्याने याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे.

या मिळणार सुविधा

अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणाऱ्या या अ‍ॅम्ब्युलन्स बोटीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत मेडिकल रूम, मेडिकल स्टोअर, ऑक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोअर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे. किमान सात व्यक्तींची सोय आहे. त्याचप्रमाणे या बोटीवर जीपीएस ट्रेकिंग डिव्हाइसही बसवण्यात येणार आहे. तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;