चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

महिलेच्या घरी चोरीप्रकरणी मोलकरणीला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. कीर्ती पाटील असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले होते. तक्रारदार महिला या अंधेरी येथे राहतात. त्यांची आई आजारी असल्याने त्यांच्या देखभालीसाठी त्यानी महिला नोकर कामाला ठेवली होती. एका महिला मोलकरणीच्या मुलीचा वाढदिवस असल्याने तिच्या बदली पर्यायी नोकर म्हणून एका महिलेला कामाला ठेवले होते.

रात्री त्या मोलकरणीने तक्रारदार यांना पह्न करून पगाराबाबत विचारणा केली. पगार परवडत नसल्याचे सांगितल्यावर ती महिला नोकर घरातून निघून गेली. काही वेळाने तक्रारदार या तेथे आल्या. त्यांनी बेडरूममधील कपाट उघडले असता दहा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या वस्तू चोरीला गेल्याचे लक्षात येताच महिलेने ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तपासासाठी एक पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी कीर्तीला ताब्यात घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;