Latur News – ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालक व क्लिनरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Latur News – ट्रॅव्हल्स रस्त्यात अडवून चालक व क्लिनरला बेदम मारहाण, गुन्हा दाखल

अहमदपूर ते पुणे जाणाऱ्या कृष्णा ट्रॅव्हल्स ला रात्रीच्या वेळी अडवून ट्रॅव्हल्सच्या चालक व क्लिनरला जबर मारहान झाल्याची घटना अहमदपूर-लातूर रोड वरील माधवमंगल कार्यालयासमोर घडली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतनुसार, 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान नेहमीप्रमाणे कृष्णा ट्रॅव्हल्स पुणेला निघाली असता. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञान पाच जणांनी ट्रॅव्हल्स थांबवली व ट्रॅव्हल्समध्ये घुसून चालक व्यंकट परशुरान तरडे व क्लिनर गणेश पांचाळ व मॅनेजर देवानंद मोहटे आदींना शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. त्याचबरोबर चालकाच्या खिशामधील 5000 रुपये जबरीने काढून घेतले. त्यादरम्यान त्यामधील काही जणांनी ट्रॅव्हल्सवर दगडफेक करुन ट्रॅव्हल्सचे समोरील, पाठीमागील व बाजुच्या काचा फोडल्या. त्यावेळी तेथे पोलीस कर्मचारी आले व त्यांनी पोलिसांनी जमलेल्या त्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक जणाने पोलीस कर्मचाऱ्यासही मारहाण केली आहे.
आरोपींची नावे स्वप्नील नरसन वलसे, गोपाळ शंकर वलसे, गजानन माधव वलसे, गणेश मोहन आरकीले , मंगेश मोहन आरकीले असे असल्याचे व ते थोरलेवाडी ता. अहमदपूर येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. या प्रकरणी अहमदपूर पोलिसांत भारतीय न्यायिक संहिता 2023, 310(2), 324(4), 324(5), 118(1), 352 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून याचा तपास अहमदपूर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल करीत आहेत. त्याचबरोबर पोलीस अमलदार विक्रम भास्करराव सुर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी सर्व आरोपींवर भारतीय न्याय संहीता कलम 132, 121 (1), 189 (2),191(2),190,115 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;