विजय थलपती ठरला देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता, शाहरुखलाही टाकले मागे

विजय थलपती ठरला देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता, शाहरुखलाही टाकले मागे

दक्षिण भारतीय अभिनेता विजय थलपती हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. ‘थलपती 69’ या आगामी चित्रपटासाठी त्याने 275 कोटी रुपये घेतले आहे. साऊथ सुपरस्टार विजय थलपती याने लागोपाठ अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हीट झाले आहेत. या चित्रपटाला त्याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट म्हणून म्हणून पाहीले जात आहे.

‘थलपती 69’ या चित्रपटाची प्रतिक्षा त्याचे चाहते अनेक दिवसांपासून पाहात होते. कन्नड आणि तेलगु इंडस्ट्रीजमध्ये अनेक ब्लॉकब्लास्टर चित्रपट देणाऱ्या प्रोडक्शन हाऊस चित्रपट तयार करीत आहे. याआधी शाहरुख खान याला अलिकडील त्याच्या चित्रपटातून सर्वाधिक 250 कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. त्यामुळे आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणार्‍या अभिनेत्यात शाहरुखचा नंबर विजय थलपती याने हिसकावला आहे.

राजकारणाला स्पर्श नसलेला चित्रपट

‘थलपती 69’ या चित्रपटाची घोषणा 13 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता विजय थलपती हा दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या सोबत काम करणार आहे. ‘थलपथी 69’ हा एक संपूर्णपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट असून आणि विजय थलपती राजकारणात प्रवेश करणार असला तरीही हा चित्रपट राजकीय विषयांना स्पर्श करणार नाही असे विनोथ यांनी चाहत्यांना वचन देताना म्हटले आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;