अहमदपूरमध्ये शेतकरी दाम्पत्यावर अज्ञाताकडून हल्ला, नवऱ्याचा मृत्यू तर पत्नी गंभीर

अहमदपूरमध्ये शेतकरी दाम्पत्यावर अज्ञाताकडून हल्ला, नवऱ्याचा मृत्यू तर पत्नी गंभीर

अहमदपूर तालुक्यातील गुगदळ व हगदळ शिवारात रात्री एका शेतकरी दाम्पत्यावर अज्ञाताने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 65 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याची हत्या केली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

रावसाहेब कडाजी केंद्रे व उषाबाई रावसाहेब केंद्रे असे या दाम्पत्याचे नाव आहे.  हे दाम्पत्य नॅशनल हायवे 361 च्या पूर्वे बाजूस हगदळ शिवारात आपल्या शेतात राहत होते. ते मूळचे रुध्दा ता. अहमदपूर येथील रहिवासी असून रात्री गावातील गणपतीची आरती करून शेतात आल्याची माहिती गावकऱ्यांकडून देण्यात आली. या वृद्ध दांपत्यावर अनोळखी व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. त्यात रावसाहेब केंद्रे हे जागीच ठार झाले तर उषाबाई केंद्रे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत तिथेच पडून राहिल्या. सकाळी उषाबाई केंद्रे शुद्धीत आल्यावर त्या चालत नॅशनल हायवे वर आल्या व तेथील उपस्थित नागरिकांना रात्री घडलेल्या घटनेची माहिती दिली. नागरिकांनी त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथे उपचारांसाठी दाखल केले. पोलीस स्टेशन अहमदपूर यांना कळवले . या घटनेच्या तपास करण्यासाठी लातूरहून फॉरेन्सिक ची टीम व पथक पाचारण करण्यात आले होते. नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या करण्यात आली हे अजून स्पष्ट झाले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;