दोन दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

दोन दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा

देशात अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने घट होत होती. मात्र आता दोनच दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था व फेडरल रिझर्व्ह बँकेने कमी केलेले व्याजदर यामुळे सोन्याचे दर वाढले आहेत. तसेच या दोन दिवसात चांदीच्या दरातही विक्रमी वाढ झाली आहे. दोन दिवसात चांदीच्या भावात 7 हजारांची प्रति किलो वाढ झाली आहे. तर सोन्याच्या भावात 2 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम अशी वाढ झाली आहे.

या दरवाढीमुळे चांदी 91000 रूपये प्रति किलो तर सोने 75200 रूपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. 1991 नंतर म्हणजे सुमारे 34 वर्षांनी कमी कालावधीत म्हणजे दोन दिवसात सोन्याचांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. ही दरवाढ दिवाळीपर्यंत स्थिरावण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. शेअर बाजारातील अस्थिरता आणि जागतिक अर्थव्यवस्थेमुळे सोन्याचांदीच्या दरात बदल होत आहेत.

13 सप्टेंबर रोजी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. एकाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल 4400 रुपयांची वाढ झाली. तर सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांची जबरदस्त परतावा मिळत आहे. मात्र, लग्नसराई जवळ येत असल्याने सर्वसामान्यांना सोनेखरेदी महागात पडत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;