Rajasthan News – ट्रकची कारला धडक बसून सहा जणांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर

Rajasthan News – ट्रकची कारला धडक बसून सहा जणांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर

राजस्थानच्या बूंदी जिल्ह्यातील हिंडोली पोलीस स्टेशनजवळ एक भयंकर अपघात घडला आहे. येथील तालाब गावाजवळ रविवारी एका ट्रकची कारला जबरदस्त धडक बसून सहा लोकांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधिक्षक, हिंडोली पोलीस उपाध्यक्षांसह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतांना गाडीतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयातील शवगृहात पाठवण्यात आले आहे. तर जखमींना कोटा येथे पाठविण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश येथील नऊ जण एका कार ने खाटूश्याम यांच्या दर्शनासाठी जात होते. दरम्यान बूंदी बोगद्यापासून अर्धा किमी दूर गेल्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जबरदस्त धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सेन्सर कर्मचारी आणि हिंदोली पोलिसांच्या मदतीने सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढता आले. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;