आता जनतेच्या न्यायालयात जाणार, दोन दिवसात राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

आता जनतेच्या न्यायालयात जाणार, दोन दिवसात राजीनामा देणार; अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला असून ते बाहेर आले आहेत. त्यांनी रविवारी आपच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाची घोषणा केली. आता आपण जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. आपण दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा केजरीवाल यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अटीशर्थींसह जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून बाहेर आले. केजरीवाल यांनी रविवारी पक्ष कार्यालयात भेट दिली. तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि महत्त्वाची घोषणा केली आहे. आता आपण दोन दिवसात राजीनामा देणार आहेत. तसेच आता जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत. महाराष्ट्रासह दिल्लीतही निवडणूका घेण्यात याव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कजेरीवाल इमानदार आहे, असा निर्णय जनता देत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसणार नाही, असेही केजरीवाल यांनी जाहीर केले. मी प्रामाणिक आहे आणि इमानदारीने काम केले आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर माझ्याबाजूने कौल द्या, असे आवाहनही त्यांनी केले. आता मी तुमच्यामध्ये आलो आहे. मी जनतेच्या दरबारात आलो आहे. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही केजरीवाल यांना इमानदार मानता की गुन्हेगार…हा प्रश्न आपण जनतेला विचारणार आहोत. जनतेने केजरीवाल इमानदार आहे, असा कौल दिल्यानंतरच आपण मुख्यमंत्रईपदाच्या खुर्चीत बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व गैर-भाजप मुख्यमंत्र्यांना आपले आवाहन आहे की, भाजपने तुम्हाला अटक करण्याचा प्रयत्न केला तर घाबरू नका. तुरुंगातूनही सरकार चालवता येते. आम्ही हे दाखवून दिले आहे. भाजपच्या सर्व कारस्थानांचा मुकाबला करण्याची ताकद आम आदमी पक्षाकडे आहे. आपण प्रामाणिक आहोत. ते आमच्या प्रामाणिकपणाला घाबरतात. त्यामुळे त्यांनी माझ्यावर पीएमएलए या देशातील सर्वात कठोर कायद्यानुसार आरोप लावले. मात्र, आपल्याला न्यायालायकडून जामीन मिळाला, असेही केजरीवाल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;