मंत्र्याच्या मुलीने 20 दिवस मोलकरीण बनून गोविंदाच्या घरात केलं होतं काम; पत्नीला संशय येताच..

मंत्र्याच्या मुलीने 20 दिवस मोलकरीण बनून गोविंदाच्या घरात केलं होतं काम; पत्नीला संशय येताच..

अभिनेता गोविंदा हा 1990 च्या काळात सर्वांत लोकप्रिय कलाकार होता. त्यावेळी त्याचा खूप मोठा चाहतावर्ग होता. गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या घराबाहेर असंख्य तरुणी तासनतास प्रतीक्षा करायचे. सेटवरही त्याला भेटण्यासाठी चाहत्यांची रांग लागायची. काही चाहती तर गोविंदाला पाहताच क्षणी बेशुद्ध व्हायच्या, असंही पत्नी सुनिता अहुजाने सांगितलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीताने गोविंदाच्या एका चाहतीचा आश्चर्यकारक किस्सा सांगितला आहे. गोविंदाची एक चाहती त्यांच्या घरात मोलकरीण बनून राहत होती. जवळपास 20 ते 22 दिवस ती गोविंदाच्या घरात मोलकरीण बनून काम करत होती. गोविंदा आणि त्याच्या पत्नीला हे नंतर समजलं की ती चाहती एका मंत्र्याची मुलगी होती.

‘टाइमआऊट विथ अंकिता’ या पॉडकास्टमध्ये सुनिताने गोविंदाच्या फॅन फॉलोइंगचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. करिअरच्या शिखरावर असताना गोविंदाचा खूप मोठा चाहतावर्ग होता. अशीच एक घटना सांगताना सुनिता म्हणाली, “गोविंदाची एक चाहती मोलकरीण बनून आमच्या घरात जवळपास 20 ते 22 दिवस राहिली होती. तिच्याकडे पाहून ती श्रीमंत घरातली मुलगी असावी, अशी शंका मला आली होती. तिला भांडी घासायला आणि फरशी पुसायलाही येत नाही, अशी तक्रार मी माझ्या सासूकडे केली होती. अखेर एकेदिवशी आम्हाला समजलं की ती खरंतर एका मंत्र्याची मुलगी होती. गोविंदाच्या प्रेमापोटी ती आमच्या घरात मोलकरीण बनून राहत होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

“मला तिच्यावर थोडा संशय आला होता. ती गोविंदासाठी रात्री उशिरापर्यंत जागी असायची. हे पाहून मी थक्क झाले होते. जेव्हा मी तिच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेतली, तेव्हा मला समजलं होतं की ती एका मंत्र्याची मुलगी होती. अखेर रडत रडत तिने कबुली दिली होती की ती गोविंदाची खूप मोठी चाहती आहे. नंतर तिचे वडील आमच्या घरी तिला घ्यायला आले. तिला घेऊन जायला त्यांच्यासोबत चार गाड्या आल्या होत्या. माझ्या मते तिने आमच्याकडे जवळपास 20 दिवस काम केलं असेल. अशा प्रकारचं गोविंदाचं फॅन फॉलोइंग होतं”, असं सुनिताने सांगितलं.

सुनिता अहुजाने गोविंदाशी 1987 मध्ये लग्न केलं. त्यावेळी गोविंदाने फिल्म इंडस्ट्रीत नुकतंच पदार्पण केलं होतं. करिअरवर परिणाम होईल या भीतीने दोघांनी जवळपास वर्षभर लग्नाबाबत गुप्तता पाळली होती. अखेर जेव्हा त्यांची मुलगी एक वर्षाची झाली, तेव्हा गोविंदाने त्याच्या लग्नाचा खुलासा केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;