लुटीच्या पैशातून धिंगाणा घालणाऱ्यांना आनंद दिघे यांनी हंटरने फोडून काढले असते – संजय राऊत

लुटीच्या पैशातून धिंगाणा घालणाऱ्यांना आनंद दिघे यांनी हंटरने फोडून काढले असते – संजय राऊत

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र आनंदाश्रमात मिंध्यांनी लुटीचा पैसा उधळून धिंगाणा घातला, राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे काम केले. आज आनंद दिघे असते तर त्यांनी या एकेकाला हंटरने फोडून काढले असते, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.

नाशिक येथे शनिवारी खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ठाणे येथील आनंदाश्रमात धर्मवीर आनंद दिघे यांच्या आसनासमोर नोटा उधळणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून आम्ही सगळेच अस्वस्थ झालो, असे खासदार संजय राऊत म्हणाले. अशा प्रकारचा धिंगाणा हा फक्त भ्रष्टाचाराच्या, लुटीच्या पैशातूनच केला जातो. बारमध्ये उडवतात त्याप्रमाणे पैसे पवित्र धार्मिक ठिकाणी उडवले जात नाहीत. पैसे उडवणारे कोण आहेत, हा पैसा आला कुठून, याची चौकशी झाली पाहिजे. स्वतःला आनंद दिघे यांचे चेले मानणारे मुख्यमंत्री किंवा अन्य कोण असतील त्यांनी यावर भाष्य केले पाहिजे. ते खरोखर धर्मवीर दिघे यांचे शिष्य असते तर असे कृत्य केलेच नसते. हा आनंद दिघे यांचा वारसा नाही. ते आज असते तर भिंतीवरचा हंटर काढून एकेकाला  फोडून काढले असते, असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते सुनील बागुल, संपर्पप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्पप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, गणेश धात्रक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्र्यांसह सरकारवर पळून जाण्याची वेळ येईल

जनतेने जाब विचारताच कार्यकर्त्याच्या दुचाकीवरून पळालेल्या मंत्री गिरीश महाजन यांच्या व्हिडीओविषयी खासदार संजय राऊत म्हणाले की, सरकारबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. एक मंत्री काय मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण सरकारवरच निवडणुकीपूर्वी पळून जाण्याची वेळ येईल, अशी टीका त्यांनी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड येथे ईव्हीएम प्रचार रथाचा शुभारंभ केला, या नियमबाह्य वर्तनासाठी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी. पण, या राज्यात फक्त विरोधकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो, सत्ताधाऱ्यांवर नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;