Hingoli News – रिसोड येथील नवविवाहितेने लॉजमध्ये घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरू

Hingoli News – रिसोड येथील नवविवाहितेने लॉजमध्ये घेतला गळफास, पोलिसांचा तपास सुरू

हिंगोली शहरातील नांदेड नाका परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (14 सप्टेंबर) सायंकाळी उशिराने उघडकीस आली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील नंदिनी विरेंद्र तिवारी यांचा विवाह दोन महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथील प्रतिक करवा यांच्याशी झाला होता. मात्र, काही दिवसांपासून नंदिनी या हिंगोली येथील बहिणीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. आज शनिवारी सकाळपासून नंदिनी या घरातून बाहेर गेल्या होत्या. दुपारपर्यंत घरी परत न आल्यामुळे त्यांच्या‌ कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला होता. काही वेळानंतर नंदिनी यांचा त्यांच्या भावजींच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. त्यामध्ये तिने शहरातील हाॉटेल गणेश इन लॉजमध्ये रूम नंबर 102 मध्ये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी लॉजकडे धाव घेऊन पाहणी केली असता,‌ रूममधील पंख्याला नंदिनी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संभाजी लेकुळे, धनंजय क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे‌ यांनी भेट दिली. पोलिसांनी नंदिनी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी नंदिनी यांच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;