Raigad News – क्षुल्लक वादाचे हाणामारीत रुपांतर, मग चाकू हल्ला करत इसमाची हत्या

Raigad News – क्षुल्लक वादाचे हाणामारीत रुपांतर, मग चाकू हल्ला करत इसमाची हत्या

क्षुल्लक वादातून चाकूने हल्ला करून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव शहरात घडली आहे. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

माणगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या अनमोल आईस्क्रीम कॉर्नर दुकानाजवळ 11 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. दोन अनोळखी इसमांचा मयत इसमाशी क्षुल्लक कारणातून वाद झाला. या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.

यावेळी एका आरोपीने मयत इसमाच्या कानशिलात लगावली. यामुळे संतापलेल्या खिशातून धारदार शस्त्र काढून पहिल्या आरोपीवर वार केला. यावेळी दुसरा आरोपी त्याला आवरण्याचा प्रयत्न करत असतानाच मयताच्या छातीवर, पोटावर दुखापती झाल्या. जखमी मयताला वैद्यकीय मदत देण्याऐवजी घटनास्थळावरून पुरावे घेऊन दोघा आरोपींना पळ काढला.

याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निवृत्ती बोऱ्हाडे पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;