Jalna News – परतूरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघांना अटक

Jalna News – परतूरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, दोघांना अटक

जालना जिल्ह्यातील परतूर शहरातील शिकलकरी भागात पोलिसांनी धडक कारवाई करत शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपींच्या घरातून पाच गावठी भर्मार बंदूक, तीन धारदार तलवारी, कोयता, सत्तूर, खंजिर, चाकुसह देशी दारु जप्त केली आहे. यामुळे परतूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

करतारसिंग उत्तमसिंग पटवा आणि सोन्या सिंग प्रेम सिंग ठाकूर अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या घरी शस्त्रास्त्रे ठेवली असल्याची माहिती परतूर पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापेमारी करत शस्त्रसाठा जप्त केला.

सदरील कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक पियूष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी दादाहरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. टी.सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक जाधव, सहायक फौजदार शिंदे, रामदास फुपाते, विजय जाधव, गोविंद पवार, राम हाडे, नितीन बोंडारे, दीपक आढे, अचुत चव्हाण, अंबादास दांडगे, भागवत खाडे, गोपानवाड, सुनील पवार, गजानन राठोड, पवन धापसे, वाघ, गायकवाड, म.पो. का. कल्पना धडे, होम गार्ड काकडे, अखडे, जाधव यांनी कारवाई केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;