कोलकात्यात एस एन बॅनर्जी रोडवर स्फोट, महिला जखमी; तपास सुरू

कोलकात्यात एस एन बॅनर्जी रोडवर स्फोट, महिला जखमी; तपास सुरू

कोलकातामध्ये एस एन बॅनर्जी रोडवर एका बॅगचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दोनजण जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिलेचा सुद्धा समावेश असून त्यांना तत्काळ एनआरएस मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 01.45 च्या सुमारास एसएन बॅनर्जी रोडवर सदर घटना घडली. रस्त्यावर पडलेली बॅग तिथून जाणाऱ्या कचरा उचलणाऱ्या व्यक्तीने उचलण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हाच मोठा स्फोट झाला. या स्फोटात बापी दास (58) आणि अन्य एक महिला जखमी झाले असून त्यांना एनआरएस मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, बापी दास यांचा उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेची माहिती मिळातच बीडीडीएसच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून स्फोट झालेल्या परिसराची तपासणी केली. जवानांनी तपासणी केल्यानंतर सदर रस्ता वाहतुकीसाठी चालू केला आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नसून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;