सर्वसामान्यांच्या रांगेतून घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; प्रसिद्ध अभिनेत्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक

सर्वसामान्यांच्या रांगेतून घेतलं लालबागचा राजाचं दर्शन; प्रसिद्ध अभिनेत्याचं नेटकऱ्यांकडून कौतुक

गणेशोत्सवात लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षी मोठीच्या मोठी रांग असते. सर्वसामान्य भक्त नऊ-दहा तर कधीकधी त्यापेक्षा जास्त तास रांगेत उभं राहून बाप्पाचं दर्शन घेतात. बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी ते गर्दीत बरीच प्रतीक्षा करतात. अशातच सेलिब्रिटींना मात्र व्हिआयपी रांगेतून बाप्पाच्या चरणी काही मिनिटांत जाऊ देत असल्याची अनेकांची तक्रार असते. सर्वसामान्यांना बाप्पाच्या चरणावर एक सेकंदही डोकं टेकवू दिलं जात नाही. पण सेलिब्रिटींना तिथे उभं राहून फोटो काढण्याचीही मुभा मिळते. सर्वसामान्य भक्त आणि सेलिब्रिटी यांच्यातील हा फरक सतत सोशल मीडियावर चर्चेत असताना आता एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याने व्हिआयपी रांगेतून नाही तर सर्वसामान्यांच्या रांगेतून लालबागचा राजाचं दर्शन घेतलं आहे.

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून रणदीप हुडा आहे. रणदीप हा आताच्या घडीतील दमदार अभिनेत्यांपैकी एक आहे. रणदीप त्याच्या कामासोबतच साधेपणासाठी खूप ओळखला जातो. शुक्रवारी तो पत्नी लिन लैशरामसोबत लालबागचा राजाच्या दर्शनासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने व्हिआयपी रांगेतून न जाता सर्वसामान्यांच्या गर्दीतून पुढे जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. रणदीपच्या याच कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. रांगेत उभ्या असलेल्या रणदीपचा आणि त्याची पत्नी लिनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रणदीपने गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लिनशी लग्न केलं. या दोघांनी इंफाळमध्ये 29 नोव्हेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. रणदीप आणि लिनचं हे लग्न अनेकांसाठी अनोखं होतं. कारण मणिपुरी पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला होता. सेलिब्रिटींचा असा अनोखा लग्नसोहळा नेटकऱ्यांनीही पहिल्यांदाच पाहिलं होतं. रणदीप हा 47 वर्षाचा आहे. तर लिन ही 37 वर्षाची आहे. दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर आहे.

रणदीपची पत्नी लिन ही प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती एक बिझनेस वुमनही आहे. या मल्टिटॅलेंटेड अभिनेत्रीने सिनेमा क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केली आहे. लिनने अनेक बड्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. प्रियांका चोप्रसह करीना कपूरपर्यंतच्या अनेक अभिनेत्रींसोबत तिने काम केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;