रितेश सरांनी तिला सांगूनही..; अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली, स्पष्टच म्हणाली ‘मी तुला कधीच..’

रितेश सरांनी तिला सांगूनही..; अरबाजची गर्लफ्रेंड निक्कीवर भडकली, स्पष्टच म्हणाली ‘मी तुला कधीच..’

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यापासून अरबाज पटेल सतत चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात त्याची आणि निक्की तांबोळीची जवळीक पाहून सुरुवातीला सूत्रसंचालक रितेश देशमुखने त्याला सुनावलं होतं. यानंतर काही दिवसांनी बिग बॉसच्या घराबाहेर असलेली अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्राने त्याच्यासोबत ब्रेकअपचा इशारा दिला होता. आता सोशल मीडियावर तिने काही पोस्ट लिहिले असून त्यात तिने निक्की तांबोळीला चांगलंच सुनावलं आहे. त्याचप्रमाणे अरबाजसोबतच्या नात्याची तिने जाहीरपणे कबुली दिली आहे. लिझाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तीन वेगवेगळे पोस्ट लिहिले आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने अरबाजची साथ देणार असल्याचं म्हटलंय, तर दुसऱ्या पोस्टमध्ये ती निक्कीवर भडकली आहे. तिसऱ्या पोस्टमध्ये लिझाने अरबाजसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलंय.

लिझा बिंद्राची पोस्ट-

यातील पहिल्या पोस्टमध्ये तिने लिहिलंय, ‘तुझ्या चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन. तुला मी कधीच एकटं सोडणार नाही.’ तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने निक्की तांबोळीवर निशाणा साधला आहे. ‘मी अरबाजच्या आईला त्याच्यासाठी प्रार्थना करताना पाहिलंय. तो शोमध्ये फक्त आणि फक्त त्याच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. तो चुकीचा नाही. तो चुकीचा तेव्हा असता जेव्हा त्या मुलीला माहित नसतं की तो माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोन वेळा रितेश सरांनीसुद्धा तिला सांगितलंय. तरीसुद्धा..’, अशी टीका तिने निक्कीवर केली आहे. लिझाने तिसऱ्या पोस्टमध्ये अरबाजसोबतच्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. ‘खेळ कोणाचंच नातं मोडू शकत नाही. होय, आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. मी कधीच त्याच्यासोबत ब्रेकअप करणार नाही’, असं तिने स्पष्ट केलंय.

अरबाज हा याआधी स्प्लिट्सविला एक्स 5 या शोमध्येही झळकला होता. त्यानंतर त्याने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनमध्ये भाग घेतला. बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्यात जवळीक पहायला मिळाली. एका एपिसोडमध्ये जेव्हा बिग बॉसने जाहीर केलं होतं की निक्की आणि अभिजीत जोडी म्हणून एकत्र टास्क करतील, तेव्हा अरबाजने रागाच्या भरात जमिनीवर खुर्ची आपटली होती. त्याचा हा राग पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;