धक्कादायक…पाच वर्षांच्या चिमुकलीला सावत्र आईने दिले चटके; गुन्हा दाखल

धक्कादायक…पाच वर्षांच्या चिमुकलीला सावत्र आईने दिले चटके; गुन्हा दाखल

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाच वर्षांच्या चिमुकलीला तिच्या सावत्र आईने किरकोळ कारणावरून चटके दिल्याची घटना उघड झाली आहे. या पाच वर्षांच्या मुलीला तिच्या सावत्र आईने तापलेल्या उलथन्याने चटके दिल्याची घटना कासारवाडी (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या मुलीला चटके दिल्याने तिच्या गालावर, ओठावर, तोंडावर, गळ्याजवळ जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी मुलीच्या सावत्र आईवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम मोकिंदराव मगरे (रा.मूळगाव शहापूर धांडेगाव, ता.अंबड,जि.जालना) दुसरी पत्नी पूजा आणि दोन मुलांसह भाडेकरू म्हणून सध्या कासारवाडी येथे रहात आहेत. शुभम व पूजा यांचे दुसरे लग्न झाले असून दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्ये आहेत. शुभम शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पाच वर्षांच्या मुलीने अंथरुणातच लघुशंका केली. या क्षुल्लक कारणावरुन तिची सावत्र आई पुजाने उलथणे तापवून तिला चटके दिले. याबाबत शेजारच्या नागरिकांनी शुभम याला ही घटना सांगितली. त्यानंतर शिरोली पोलीस ठाण्यात शुभम मगरेने पत्नी पुजा विरोधात तक्रार दाखल केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;