महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर केंद्रातील मोदी सरकार कोसळणार; पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यात प्रत्येक पक्षाने तयारीही सुरू केली आहे. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता सत्ताबदल अटळ असल्याचा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाराष्ट्रात आणि हरयाणात काँग्रेसची सत्ता येणार आहे. त्यामुळे या दोन राज्यातील निवडणुकीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळेल, असा दावाही त्यांनी केला आहे. महाराष्ट्रात आणि हरयाणात सत्तांतर झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार केंद्र सरकारचा पाठींबा काढून घेतील, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

जनतेचा निर्धार पाहता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळणार आहे. महाराष्ट्रासह हरियाणातही सत्तांतर होणार आहे. त्यामुळे या दोन राज्यातील निवडणुकानंतर केंद्रातील मोदी सरकार फार काळ टिकणार नाही. या दोन राज्यातील निवडणुकांच्या भीतीमुळे मोदी सरकारची खुर्ची डळमळीत झाली आहे, असा दावाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

आगामी काळात अनेकजणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपचा खरा चेहरा समजलेले नेते आता त्यांच्यासोबत राहणार नाहीत. सत्तेत असलेले भ्रष्ट सरकार उलथवून टाकण्यासाठी, महागाईवर नियंत्रण मिळवण्याकरता, बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेचा कौल महाविकास आघाडीला असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहाता राज्यात महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळातील, असा दावाही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;