चंद्रपूरात जुगार अड्ड्यावर धाड; हॉटेल मालकासह चार जणांवर कारवाई

चंद्रपूरात जुगार अड्ड्यावर धाड; हॉटेल मालकासह चार जणांवर कारवाई

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या समृद्धी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अचानक धाड टाकून हॉटेल मालकासह चार जणांवर कारवाई केली आहे. आरोपींकडून 2 लाख 23 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशोक मत्ते, शाम थेरे, धीरज चौधरी, अविनाश हांडे, दिपक पांडे अशी आरोपींची नाव आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस हॉटेलात चालणाऱ्या जुगारावर पाळत ठेवत होते. काही महिन्यांपासून या हॉटेलात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पाळत ठेवल्यावर माहितीची खातरजमा होताच पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी पडोली पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;