भाजपच्या बड्या नेत्याची अश्लील क्लिप माझ्याकडे होती, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

भाजपच्या बड्या नेत्याची अश्लील क्लिप माझ्याकडे होती, एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

माझ्या मोबाईलमध्ये भाजपच्याच एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही ती क्लिप आपण दाखवली होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आज केला.

माझ्यामागे ईडी लावली तर मी त्यांची सीडी लावेन, असे सांगत एकनाथ खडसे यांनी चार वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यांनी सांगितलेली सीडी अद्यापपर्यंत बाहेर आलेली नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा करताना खडसे म्हणाले, त्यांनी ईडी म्हटले त्या ओघात मी सीडी म्हटले होते.

पण माझ्याकडे काही कागदपत्रे आणि क्लिप होत्या, त्यामध्ये भाजपच्या एका बड्या नेत्याची अश्लील क्लिप होती. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना मी ती क्लिप दाखवली होती. मुलीसोबत काय चाळे चालले आहेत ते बघा, असे वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते.

मुलीशी अश्लील चाळे करणारा तो नेता कोण, असा प्रश्न खडसे यांना केला असता त्या नेत्याचं नाव घेणं टाळलं. कोण चाळे करत होतं, त्याचं नाव आता सांगत नाही. तुम्हाला माहीत असलेल्या नेत्यांपैकीच एकाची ती क्लिप होती. माझ्याकडे असलेली ती अश्लील क्लिप माझ्या मोबाईलमधून कशी काय डिलीट झाली काही कल्पना नाही. मुक्ताईवर माझी श्रद्धा आहे. मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे क्लिप होती, असे खडसे म्हणाले.

क्लिप देणाऱ्याला भाजपने मॅनेज केले

तुमच्याकडे असलेली क्लिप डिलीट झाली. पण ज्यानं तुम्हाला ती दिली त्याच्याकडे तर ती असेल ना, असा प्रश्न खडसेंना विचारण्यात आला. त्यावर ज्यानं मला क्लिप दिली त्याला त्यांनी मॅनेज करून टाकलं. फ्लॅट, पाच-दहा कोटी, काय दिलं ते माहीत नाही. तो माणूस आता भाजपकडे असून त्याची 20 ते 25 कोटींची मालमत्ता असल्याचे खडसे म्हणाले.

राज्यपालपदाची ऑफर दिली

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती. राज्यपालपदासाठी शिफारस करण्याचा शब्द एकुलत्या एका मुलीची शपथ घेऊन त्यांनी दिला होता. पण पुढे काय झालं मला माहीत नाही, असे सांगत फडणवीसांनी शब्द पाळला नाही. देवेंद्र फडणवीस आणि महाजन यांनी आपला पक्ष प्रवेश रोखल्याचे खडसे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;