निवडणुकीच्या तोंडावरच खोऱ्यात रक्तपात, कश्मीरमध्ये एका बहाद्दर अधिकाऱयासह दोन जवान शहीद

निवडणुकीच्या तोंडावरच खोऱ्यात रक्तपात, कश्मीरमध्ये एका बहाद्दर अधिकाऱयासह दोन जवान शहीद

किश्तवाड जिल्ह्यातील पर्वतमय भागात उंचावर दहशतवाद्यांशी शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झालेल्या चकमकीत एका कनिष्ठ अधिकाऱयासह दोन जवान शहीद झाले तर दोघे जण जखमी झाले. जम्मू-कश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पाच दिवसांवर आले असताना दहशतवादी कारवाया आणि हल्ले वाढले आहेत.

लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त सुरक्षा पथकाने छत्रू पट्टय़ातील उंचावरील नैदघम गावाच्या परिसरात घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केली असता पिंगनल दुगड्डा भागातील जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या चौघांपैकी नायब सुभेदार विपन पुमार आणि शिपाई अरविंद सिंह हे शहीद झाले अशी माहिती सुरक्षा अधिकाऱयांनी दिली. लष्करानेही दोन जवानांच्या वीरमरणाला दुजोरा दिला आहे.

बारामुल्लामध्येही चकमक

बारामुल्ला जिल्ह्यातही शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, असे पोलिसांनी सांगितले. बारामुल्लाच्या चक टप्पर क्रिरी पट्टण भागात चकमक सुरू झाली आहे, असे कश्मीर झोन पोलिसांनी एक्सवर म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;