Chandrapur News – घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची चाकू भोकसून हत्या, मदतीसाठी येणाऱ्या शेजाऱ्यांनाही धमकावले

Chandrapur News – घरगुती भांडणातून पतीकडून पत्नीची चाकू भोकसून हत्या, मदतीसाठी येणाऱ्या शेजाऱ्यांनाही धमकावले

घरगुती भांडणातून पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली. चाकूने भोसकल्यानंतर पत्नी विव्हळत घराच्या अंगणात पडली होती. यावेळी धावत येणाऱ्या शेजाऱ्यांनाही हातात चाकून घेऊन मदतीसाठी न येण्यासाठी धमकावले. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कोठारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

वंदना धनपाल रामटेके असे मृत महिलेचे नाव आहे. तर धनपाल माधव रामटेके असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वंदना आणि धनपाल यांच्यात नेहमी भांडणे होत असत. धनपाल हा दारुविक्रीचा अवैध धंदा करत होता. त्याचे पत्नी आणि मुलांसोबत पटत नव्हते. धनपालला दोन मुलगे असून मोठा मुलगा बाहेरगावी राहतो तर लहान मुलगा त्याच्याजवळ राहतो.

गुरुवारी सकाळी धनपालचे पत्नी वंदनासोबत पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. यानंतर धनपालने घरातील चाकू आणला आणि घराच्या अंगणातच वंदना यांच्यावर सपासप वार केले. वंदना या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. ते पाहून शेजारी मदतीसाठी धावले. मात्र धनपालने मदतीसाठी धावणाऱ्या शेजाऱ्यांनाही चाकू दाखवून धमकावले.

गावकऱ्यांनी कोठारी पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत धनपाल यास ताब्यात घेतले. यानंतर वंदना यांना उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु तेथे डॉक्टर हजर नसल्याने तिला बल्लारपूरकडे घेऊन जात असताना रस्त्यातच वंदनाने प्राण सोडले.

याप्रकरणी धनपालच्या मुलाने कोठारी पोलिसात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत धनपालला अटक केली आहे. कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश खरसान पुढील तपास करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;