Nagpur News – लग्नासाठी प्रेयसीचा तगादा, प्रियकराने जमिनीत पुरत संपवलं

Nagpur News – लग्नासाठी प्रेयसीचा तगादा, प्रियकराने जमिनीत पुरत संपवलं

लग्नासाठी दबाव टाकत असल्याने प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. महेश वलसकर असे अटक आरोपीचे नाव आहे.

महेशची दूध पावडरची कंपनी आहे. या कंपनीत 24 वर्षीय प्रिया नोकरी करत होती. यादरम्यान प्रिया आणि महेशचे प्रेमसंबंध जुळले. महेशचे रामटेक परिसरात रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्येही प्रियाचे नियमित येणे-जाणे होते. प्रेमसंबंधादरम्यान प्रिया गर्भवती झाली. मात्र महेशने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी प्रिया अचानक गायब झाली. तिचा फोनही बंद येत होता. प्रिया कुटुंबापासून वेगळी गोधनी येथे राहत होती. तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिची आई गोधनी येथे तिला भेटण्यासाठी पोहचली. यावेळी तिच्या खोलीला कुलूप पाहून आईने थेट मानकापूर पोलीस ठाणे गाठले. प्रिया बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसात दाखल केली.

पोलिसांनी प्रियाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिसांना महेश आणि प्रियाच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. पोलिसांनी महेशला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

प्रिया वारंवार लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे अंबाला येथील रिसॉर्टमध्ये तिची गळा दाबून हत्या केली. मग मृतदेह जमिनीत पुरल्याचे महेशने पोलिसांना सांगितले. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी बुधवारी प्रियाचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी महेशला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;