Pune News – काळेवाडीत हॉटेलमध्ये गोळीबार, अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

Pune News – काळेवाडीत हॉटेलमध्ये गोळीबार, अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाला अटक

पिंपरी चिंचवडमधील एका हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकासह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सचिन दत्तू नढे आणि विनोद जयवंत नढे अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन दत्तू नढे आणि विनोद जयवंत नढे यांच्यासह चौघेजण काळेवाडी पेट्रोल पंपासमोरील एका हॉटेलमध्ये बसले होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर अचानक फटाका फुटल्यासारखा आवाज आला. हॉटेलचे मॅनेजर तुषार भोजवानी यांनी तात्काळ पहिल्या मजल्यावर धाव घेऊन पाहिले असता सचिन गढे यांच्या हातात रिव्हॉल्वर होते.

सचिन नढे याने हॉटेलमधील सर्विस टेबलवर गोळी झाडली. ही गोळी टेबलमधून आरपार गेल्याने टेबलाला छिद्र पडले. गोळीबार होताच हॉटेलमधील इतर ग्राहक घाबरून पळून गेले. याप्रकरणी हॉटेल मालकाने वाकड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) माजी नगरसेवक विनोद नढे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, गोळीबार का केला याबाबत माहिती मिळू शकली नाही. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. वाकड पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;