महाराष्ट्रात दोनच साहेब, एक बाळासाहेब अन् दुसरे…; अमोल कोल्हे यांनी घेतला अजित पवारांचा समाचार

महाराष्ट्रात दोनच साहेब, एक बाळासाहेब अन् दुसरे…; अमोल कोल्हे यांनी घेतला अजित पवारांचा समाचार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर दोन गट पडले असून एक गट अजित पवारांसोबत, तर दुसरा शरद पवारांसोबत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत जनता शरद पवारांच्या पाठीमागे उभी राहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार निवडून आले, तर अजित पवार गटाचा एक खासदार निवडून आला. खुद्द अजित पवार यांची पत्नीही बारामतीतून पराभूत झाली. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून दोन्ही बाजूने एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला जात असून खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचा खरपूस समाचार घेतला.

खेड-आळंदी येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना मंत्रि‍पदाचे आश्वासन देत आता आपणच साहेब असल्याची टिप्पणी केली. याचा अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला असून फक्त पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणून कुणी साहेब होत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

अजित पवारांवर टीका करताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच साहेब आहेत. एक हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरदचंद्रजी पवारसाहेब. या दोघांनाच आमची पिढी तरी साहेब मानते. फक्त एखाद्या पक्षाचा अध्यक्ष होणे म्हणजे साहेब नाही.

केजरीवाल यांच्या जामिनावर शरद पवार यांची प्रतिक्रिया; म्हणाले, ‘देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम’

त्यासाठीचा सांस्कृतिक व्यासंग असेल, सामाजिक व्यासंग असेल, दुसऱ्याच्या जीवावर नव्हे तर स्वत:च्या कर्तृत्वावर उभे राहणे असेल किंवा संकट आल्यानंतर पळून न जाता संकटाला छातीवर झेलणे म्हणजे पवारसाहेब असणं आहे आणि हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने अजितदादांनी सांगण्याची गरज नाही, असा टोलाही अमोल कोल्हे यांनी लगावला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;