Bigg Boss Marathi : आर्याने निक्कीच्या थेट कानाखालीच लगावली, बिग बॉस पाहणं बंद करू, नेटकऱ्यांचा इशारा

Bigg Boss Marathi : आर्याने निक्कीच्या थेट कानाखालीच लगावली, बिग बॉस पाहणं बंद करू, नेटकऱ्यांचा इशारा

‘बिग बॉस मराठी’ 5 वा सीझन सध्या बराच गाजतोय, घरात सतत वाद होताना दिसतात, त्यामुळे शो चर्चेत असतो. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात झालेल्या एका घटनेमुळे तर मोठा वादंग निर्माण झाला आहे. एका टास्कदरम्यान निक्की तांबोळी आणि आर्यामध्ये वाद झाला. त्याचदरम्यान जोरदा राडा झाला आणि तेवढ्यात आर्याने निक्कीला जोरदार कानाखाली लगावली. त्याचे अनेक पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. या घटनेनंतर बिग बॉस आता आर्याला शिक्षा सुनावणार आहेत. मात्र यामुळे काही नेटकरी भडकले आहेत. तर निक्कीला अद्दल घडायला हवी होती असे म्हणत काही नेटकऱ्यांनी आर्याचं चक्क कौतुक केलंय.आर्याला जर शिक्षा दिली, घराबाहेर काढलं तर बिग बॉस पाहणंच बंद करू असा इशाराही काही प्रेक्षकांनी दिला आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात कॅप्टन्सीचा टास्क सुरू होता. याच कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की -आर्यामध्ये भांडण जोरदार झालं. त्यांची वादावादी होण्याआधी निक्कीने अंकिता आणि पंढरीनाथ कांबळी यांनाही सुनावलं होतं. तर निक्कीसोबत भांडण झाल्यानंतर चिडलेल्या आर्याने निक्कीच्या कानशिलात लगावली. याचे जोरदार पडसाद उमटले. बिग बॉसने आर्याला तिच्या कृत्याबद्दल कठोर शिक्षा सुनावली. पण ही शिक्षा काय आहे हे प्रोमोमध्ये दिसलं नाहीये.

नेमकं झालं तरी काय ?

कॅप्टन्सी पदाच्या टास्कदरम्यान जादुई हिरा मिळवण्यासाठी अंकिता, वर्षा ताई, जान्हवी, निक्की आणि आर्या यांच्यात चढाओढ झाली. यात जादुई हिरा मिळवण्यासाठी झटापट सुरू होती. त्यांच्या या भांडणाने टोक गाठलं आणि एका क्षणी आर्याने निक्कीला कानाखालीच लागवली.यानंतर निक्कीने ‘बिग बॉस’ला सांगितलं की आर्याने मला मारलंय, मी ते सहन करू शकत नाही. तिने आर्याला एव्हिक्ट करण्याचीही मागणी केली. बिग बॉसनेही आर्याच्या कृतीचा निषेध करत तिला शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतलाय. तिला काय शिक्षा होते, ते आजच्या भागात स्पष्ट होईल.

नेटकऱ्यांचा आर्याला पाठिंबा

मात्र नेटकऱ्यांनी आर्याला पाठिंबा दर्शवला आहे. निक्कीला अद्दल घडायला हवी होती, आर्याने योग्य केलं असे अनेकांनी म्हटलंय. आर्याने निक्कीला मारल्याने मन सुखावलं असल्याचे एका युजरने नमूद केलं. आर्याने अगदी चांगले केलेले आहे. आर्या यांना bigg Boss ने काही शिक्षा केल्यास आम्ही बिग बॉस बघणे बंद करू , असं एका युजरने सुनावलं. ‘जर आर्या चुकीची ठरवली असेल तर ” अरबाज चा पण ताबा सुटला होता ” त्यानी ही अभिजित ला चुकीच्या पद्धतीने धक्का दिला आहे ” त्याला शिक्षा करा ” आम्ही काय डोळे झाकून bb बघत नाही ” नाहीतर ॲक्शन रिप्ले मध्ये आर्याची चापट दाखवा ‘असंही एका युजरने म्हटलं. पण काही लोकांनी आर्याच्या कृत्याचा निषेधही केलंय. “कारण कितीही योग्य असलं तरीही हिंसा करणं चुकीचं आहे” असं त्यांचं म्हणणं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;