भाजपच्या मुजोर जिल्हा परिषद सदस्याने केली ग्रामस्थांना मारहाण, केमिकल टँकर अडवल्याचा जाब विचारल्याची शिक्षा

भाजपच्या मुजोर जिल्हा परिषद सदस्याने केली ग्रामस्थांना मारहाण, केमिकल टँकर अडवल्याचा जाब विचारल्याची शिक्षा

भाजपचा मुजोर जिल्हा परिषद सदस्य चेतन धोडी याने अधिकार नसतानाही पैसे वसूल करण्याच्या बहाण्याने रात्री उशिरा केमिकल टँकर अडवले. त्यावरून वाद निर्माण झाला असून जाब विचारण्यासाठी गेलेला अन्य सदस्य व ग्रामस्थांना लोखंडी रॉडने धोडी याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यात महेश तांबडा व पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मढवी हे जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रात्री उशिरा चेतन धोडी व त्याच्या काही साथीदारांनी केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचालकाला पकडले. एवढेच नव्हे तर त्याच्याकडून काही कागदपत्रेदेखील ताब्यात घेतली. टँकरचालकाने ही बाब  आपल्या मालकाला फोनवरून सांगितल्यानंतर संबंधित मालकाने आपल्या ओळखीच्या कमळाकर पवार यांच्याकडे मदतीसाठी याचना केली.

पवार यांनी पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण मढवी तसेच सामाजिक कार्यकर्ते विनोद पराड यांना सोबत घेऊन नवजीवन हॉटेल परिसरात धाव घेतली. या सर्वांनी चेतन धोडी याला फैलावर घेतले, पण धोडीसह त्याच्या साथीदारांनी सर्वांना मारहाण केली. घटनेप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात धोडी याच्यासह अन्य आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या मारहाणीनंतर धोडी फरार झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;