जरा जपून… गृहिणींनो सावधान! बंदी घातलेला स्वस्त पण घातक लसूण बाजारात आलाय, गुजरातेत गोणीच्या गोणी आढळल्या

जरा जपून… गृहिणींनो सावधान! बंदी घातलेला स्वस्त पण घातक लसूण बाजारात आलाय, गुजरातेत गोणीच्या गोणी आढळल्या

चीनची घुसखोरी रोखण्यात सपशेल अपयशी ठरलेले एनडीए सरकार आता बंदी घातलेल्या घातक चिनी मालाचा तस्करीद्वारे हिंदुस्थानच्या बाजारपेठेत होणारा शिरकाव रोखण्यातही पह्ल ठरल्याचे उघड झाले आहे. बंदी घातलेला स्वस्त, परंतु आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेला लसूण बाजारात आला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्येच या लसणाच्या गोणीच्या गोणी आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा लसूण गुजरातच्या बाजारपेठेतून महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्येही दाखल होऊ शकतो. त्यामुळे हा लसूण मसाल्यांद्वारे आपल्या जेवणापर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार असून गृहिणींना सतर्प राहावे लागणार आहे.

कीटकनाशकांचा प्रचंड भडीमार केल्याने या लसणाला बुरशीजन्य कीड लागण्याचा धोका संभवतो. त्यामुळे हा चिनी लसूण भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्यात आला होता. आरोग्याला अत्यंत अपायकारक असलेल्या या लसणावर 2014 पासून हिंदुस्थानात बंदी घालण्यात आली आहे. तरीही चिनी लसूण हिंदुस्थानच्या बाजारपेठेत तस्करीद्वारे दाखल झाल्याचे चित्र आहे. हिंदुस्थानी लसणाच्या तुलनेत चिनी लसूण लक्षणीयरीत्या स्वस्त असल्याने तो आपसूकच ग्राहकांना आकर्षित करतो. बेकायदेशीररीत्या बाजारात विक्रीसाठी आणण्यात आलेला हा लसूण ग्राहक नकळत खरेदी करत असल्याचेही उघड झाले आहे.

गुजरातमध्ये 30 गोणी सापडल्यानंतर सरकार सतर्क

गुजरातमधील राजकोटमध्ये चिनी लसणाच्या तब्बल 30 गोणी सापडल्या. गोंडल येथील पृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिनी लसूण आढळून आल्याने मोठा गोंधळ उडाला. व्यापाऱयांनी गोंडल एपीएमसीमध्ये चिनी लसणाची बेकायदेशीररीत्या होत असलेली विक्री पाहून थेट लसणाचा लिलाव थांबवला, या बेकायदेशीर विक्री खरेदीविरोधात व्यापाऱयांनी आंदोलनही केले.

चिनी लसूण कसा ओळखाल?

चिनी लसूण आकाराने लहान असतो. त्याचा रंग फिकट पांढरा किंवा फिकट गुलाबी असतो. याउलट हिंदुस्थानी लसूण मोठा आणि सामान्यतः पांढरा किंवा मलई रंगाचा असतो. हिंदुस्थानी लसणाचा वास अधिक तीव्र असतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;