जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

 

रेल्वेत 11,548 पदांसाठी भरती

रेल्वे भरती मंडळांनी आरआरबी एनटीपीसी 2024 अंतर्गत नॉन टेक्निकल पदासाठी भरतीची घोषणा केली. पदवीधर-स्तरीय पदांसाठी इच्छुक उमेदवार 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अंडरग्रॅज्युएट-स्तरीय पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत खुली असेल.

उद्यापासून चार दिवस बँका बंद

बँकेसंबंधित काही कामे असतील तर ती लवकर करून घ्या. कारण उद्या शनिवारपासून बँका सलग चार दिवस बंद राहणार आहेत. 14 सप्टेंबरला दुसरा शनिवार, 15 सप्टेंबरला रविवार, 16 सप्टेंबरला सोमवारी ईद-ए-मिलाद आणि 17 सप्टेंबरला मंगळवारी अनंत चतुर्दशी म्हणजे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन आहे. त्यामुळे बँका बंद राहणार आहेत.

आय ड्रॉप प्रेस्वूवर बंदी

डोळ्यांचा चष्मा घालवण्याचा दावा करणाऱया आय ड्रॉप प्रेस्वूवर बंदी घालण्यात आली आहे. हिंदुस्थानी बाजारात उपलब्ध होण्याआधीच यावर बंदी घातली गेली आहे. या ड्रॉपने दृष्टिदोष कमी होऊन चष्मा कायमचा सुटू शकतो. याच्या नियमित वापरानंतर चष्मा वापरण्याची गरज भासणार नाही, असा दावा करण्यात आला होता.

हिंदुस्थानी तरुणाची इस्रायलमध्ये हत्या

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता एक वर्ष पूर्ण होईल. येथील तणाव अद्याप कमी झालेला नाही. इस्रायलमध्ये मूळचा हिंदुस्थानी असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. गेरी गिदोन हंघल असे या तरुणाचे नाव असून तो इस्रायली सैनिक म्हणून काम करत होता. तो 2020 पासून इस्रायलमध्ये राहत होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;