असलं रडकं सरकार बघितलं नाही : मनोज जरांगे पाटील

असलं रडकं सरकार बघितलं नाही : मनोज जरांगे पाटील

असलं रडकं सरकार कधीच बघितलं नाही. फडणवीस खूप हुशार, चाणक्य आहेत असे वाटायचे. मात्र ते फक्त याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस करण्यात आणि फोडाफोडीत हुशार आहेत. त्यामुळे भाजपाचेच लोक त्यांचा कार्यक्रम लावणार आहेत. म्हणून मराठ्यांना आरक्षण देऊन टाका. समाज तुमचा फायदा करेल. पण नाही दिले तर निवडणुकीत खेळ खल्लास, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

जरांगे म्हणाले की, तुम्हाला जर राज्यातील ५० ते ५५ टक्के मराठा विरोधात जाऊ द्यायचा नसेल तर ओबीसीतून आरक्षण द्या. मराठे दादागिरीला मोजत नाहीत, सगळ्यांची दादागिरी मोडीत काढणार आहेत. महाविकास आघाडी सत्तेत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कुठून आरक्षण मागणार? त्यांना काय प्रश्न विचारणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांची आशा तुमच्याकडून आहे. तुम्ही आरक्षण द्या, तुम्हाला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीत त्यांना फायदा झाला कारण तुम्ही आरक्षण दिले नाही, असे ते म्हणाले.

प्रसाद लाड यांच्यावर टीका करताना जरांगे म्हणाले, थोड्या दिवसात ते बी येडं होतं की काय? माझे एकच म्हणणे आहे, तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, मराठे तुम्हाला डोक्यावर घेतील, तुम्ही नाही दिले की निवडणुकीत खेळ खल्लास करतील, असा इशारा त्यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;