जया यांनी थेट उडवली अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची खिल्ली, थेट राग आणि…

जया यांनी थेट उडवली अमिताभ बच्चन यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीची खिल्ली, थेट राग आणि…

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल सध्या विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांच्यात देखील वाद असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. ऐश्वर्या राय ही जलसा बंगला सोडून तिच्या आईच्या घरी शिफ्ट झाल्याचे सांगितले जातंय. जया बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले होते.

जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या आई वडिलांमध्ये कायमच वाद होत. हेच नाही तर नेहमीच्या वादाला कंटाळून अमिताभ यांनी दोन घर घेतले होते. एका घरात जया बच्चन आणि त्यांचे लेकरं राहत तर दुसऱ्या घरात अमिताभ बच्चन आपल्या पालकांसोबत राहत. जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या वडिलांचे कधीच चांगले रिलेशन राहिले नसल्याचे देखील सांगितले जाते.

जया बच्चन यांनी एकदा थेट हरिवंशराय बच्चन यांची खिल्ली उडवली होती. रिपोर्टनुसार, अमिताभ आणि इतर काही मंडळी हरिवंशराय बच्चन यांच्या वडिलांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त जमले होते. यावेळी हरिवंशराय बच्चन म्हणाले की, अस्सी ते लप्सी. यानंतर जया म्हणाल्या होत्या की, तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर काय म्हणाल? तुम्ही 100 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला बोलता येणार नाही, आम्ही बोलू….

जया बच्चन यांचे हे बोलणे ऐकून अमिताभ बच्चन यांच्या आईला वाईट वाटले. यावर त्या म्हणाल्या की, का बोलणार नाहीत, खूप बोलतील…यानंतर जया बच्चन शांत झाल्या…अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला होता. विशेष म्हणजे आताही अमिताभ बच्चन यांचे चित्रपट धमाका करताना कायमच दिसतात. 

सध्या काैन बनेगा करोडपतीला अमिताभ बच्चन हे होस्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शोमध्ये ते आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे करताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला. जया बच्चन या कधीच वेळ देत नसल्याचे म्हणून अमिताभ बच्चन यांच्यावर नाराज होत नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;