केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक केलीय – आदित्य ठाकरे

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक केलीय – आदित्य ठाकरे

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख , आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली . या पत्रकार परिषदेत मर्सिडीझ बेन्झवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टाकलेली धाड आणि इतर विषयांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ‘आधीच महाराष्ट्रातून मोठमोठे उद्योग बाहेर जात असताना, जे उद्योग इथे वर्षानुवर्षे आहेत; ज्यांच्यामुळे हजारो-लाखो तरुणांना रोजगार मिळाले आहेत, त्या उद्योगांना त्रास देऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय साध्य करू इच्छित आहे’, असा संतप्त सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला.

आदित्य ठाकरे यांनी MPCB ला पत्र लिहिलं आहे . या पत्रातून मर्सिडीझ बेन्झने पर्यावरणाचा नेमका कसा ऱ्हास केला आहे? त्यांनी नेमकं काय केलं आहे? असा सवाल विचारला आहे . तसेच त्यांनी कंपनीला निव्वळ भेट दिली होती की ती धाड होती? त्यांच्यावर नेमका किती दंड आकारण्यात आला आहे? असा प्रश्न विचारला आहे . तसेच यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्टीकरण देणे आवश्यक असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले .

केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या डोळ्यात धूळफेक केलीय

केंद्र सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले की लोकांच्या पुढ्यात सरकारने धूळ फेक केली . ग्लोबल economic hub बनवायचं असेल तर इतका वेळ का लागतो आहे ? international financial center हे मुंबईला द्या.. गिफ्ट सिटी तुम्ही महाराष्ट्र बाहेर म्हणजेच गुजरातला नेली. पण आता गिफ्ट सिटीचे मुंबईत उदो उदो केल जातय , पण मुंबईचे नाव घेतले जात नाही. यात भाजप काय साध्य करू पाहते ? तरुण तरुणी अनेक जण नोकऱ्या नाहीत म्हणून आंदोलन करत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले

पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागावी

पियूष गोयल यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. जर इंडस्ट्रीजवर अशा धाडी पडत असेल तर याचा परिणाम केवळ मर्सिडीज बेंझवरच्या येथील कंपनीवर नाही होत तर, जर्मनी मध्ये असलेल्या या प्रमुख कंपनीवर परिणाम होतो याची दखल घ्यावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;