Jalna News – पत्नीला व्हिडिओ कॉल करत पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

Jalna News – पत्नीला व्हिडिओ कॉल करत पतीची आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

जालन्यातील दहीफळे तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणातून पत्नीला व्हिडिओ कॉल करत पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दहीफळ खंदारे येथे घडली आहे. आकाश नायबराव गायकवाड असे मयत पतीचे नाव आहे.

आकाश हा मुंबई येथे पत्नीसोबत राहत होता. गुरुवारी सकाळी आकाश मुंबईहून आपल्या गावी आला होता. गावी आल्यानंतर दुपारी आकाश शेतात गेला. तेथे जात पत्नीला व्हिडिओ कॉल करून मी आत्महत्या करत आहे असे सांगितले. त्यानंतर लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

आकाशने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कळू शकले नाही. आकाशच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;